You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात २० वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात संपन्न

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात २० वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात संपन्न

*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात २० वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात संपन्न*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संख्याशास्त्र विभागातर्फे २९ जून २०२६ रोजी ‘२० वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संख्याशास्त्राचे जनक आणि महान सांख्यिकी तज्ज्ञ प्रोफेसर पी. सी. महालानोबिस यांच्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील सांख्यिकी क्षेत्राच्या विकासात प्रा. महालानोबिस यांचे योगदान अतुलनीय असून, स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आधुनिक भारताच्या औद्योगिक विकासासाठी त्यांनी वैज्ञानिक योजनेची नवी दिशा दिली. त्यांच्या याच महान कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी २९ जून हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.
या दिनाचे औचित्य साधून संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी ‘विविध क्षेत्रांमध्ये संख्याशास्त्राचा उपयोग’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि आकर्षक भित्तिपत्रके (पोस्टर्स) तयार केली होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला पुष्पहार, दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सांख्यिकीचे व्यावहारिक महत्त्व मांडले होते. यानंतर महाविद्यालयातील कुमारी स्नेहा बिडीये या विद्यार्थिनीने प्रा. पी. सी. महालानोबिस यांच्या जीवनप्रवासावर आणि सांख्यिकी क्षेत्रातील त्यांच्या ऐतिहासिक कार्यावर प्रकाश टाकला. तसेच संख्याशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. के. पी. पाटील यांनी दैनंदिन जीवन आणि संशोधनात सांख्यिकीचे असणारे महत्त्व विशद करत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. के. आर. चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आधुनिक युगात डेटा आणि सांख्यिकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील नवनवीन संधींचा लाभ उठवला पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. एस. भास्कर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गणित विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. प्रतिमा मांजरेकर यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. संजय रावराणे, महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

_________________________
*संवाद मीडिया*

*पावसाळ्यात सांधेदुखी, अंगदुखी, पाठदुखी वाढतेय का? 🤕*

*आजच सहभागी व्हा*
*🌧️ मान्सून पंचकर्म महोत्सव*
*माधवबाग कुडाळ क्लिनिक आयोजित 🌿*

*✅ पूर्ण पंचकर्म उपचार*
*(स्नेहन + स्वेदन + बस्ती)*
*💰 फक्त ₹999/- (~₹2000/-)~*

*🎯 पंचकर्माचे फायदे:*
*✔️ सांधे व स्नायूंना आराम*
*✔️ शरीरशुद्धी*
*✔️ वातदोष नियंत्रण*
*✔️ ताणतणाव कमी*
*✔️ शरीर हलके व ताजेतवाने*

*🎁 सोबत मोफत पावसाळी आयुर्वेदिक रेसिपी पुस्तक*

*👥 फक्त 50 व्यक्तींसाठी मर्यादित*

*शिबिर कालावधी: १ जून ते 30 जून*

*📍 माधवबाग कुडाळ क्लिनिक*

*📞 नाव नोंदणीसाठी: 9371621952*

*⏳ जागा मर्यादित आहेत. आजच आपली नोंदणी करा!*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207580/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा