You are currently viewing मनसे आमदारांकडून प्रतापगडाच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची मदत

मनसे आमदारांकडून प्रतापगडाच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची मदत

मुंबई प्रतिनिधी

उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकालीन गड किल्ले असलेल्या महाराष्ट्राचा इतिहास शेकडो वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास असलेले गड-किल्ले आता नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मात्र अस असल तरी शिवप्रेमी असलेले तरुणांनी आपला इतिहास नामशेष होऊ नये म्हणून किल्ले दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. किल्ले दुरुस्तीच्या या मोहिमेला मनसे आमदार राजू पाटील यांची साथ लाभली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या करकर्दितले गड-किल्ल्यांन पैकीचा एक प्रतापगड होय. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता.

यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माची खालील भाग खाचल्यामुळे दुरुस्तीच्या कामाचे धोरण सह्याद्री प्रतिष्ठान च्या तरुणांनी हाथी घेतले आहे. प्रतागडाच्या दुरुस्तीला लगबग २१ लाख रुपयांचा खर्च आहे .
सह्याद्री प्रतिष्ठाना यांनी लोक वर्गणीचे काम करायचे ठरवले आणि म्हणूनच किल्ला संवर्धनाच्या कामासाठी मनसेचे नेते आणि कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील यांची आर्थिक मदत केली आहे. गडकिल्ले वाचले पाहिजे आणि त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे नेहमीच राज ठाकरे सांगत आले आहेत. त्यालाच अनुसरून प्रतापगडाच्या माची खालच्या डोंगर दुरुस्तीच्या कामासाठी राजू पाटील यांनी ५ लाखांची मदत केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − seventeen =