You are currently viewing चिंदर माळरानावर आंबा काजू कलमबागा जळून खाक

चिंदर माळरानावर आंबा काजू कलमबागा जळून खाक

मालवण

चिंदर सडेवाडी येथील माळरानावर दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग चिंदर सडेवाडी माळरानावर पसरली. या आगीने रौद्ररुप धारण केल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. या आगीत मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या आंबा काजूकलम बागा भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.आग लागल्याचे समजताच चिंदर गावातील ग्रामस्थांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला यामुळे काही बागा वाचवण्यात यश आले मात्र ही आग डोंगराच्या दिशेने सरकली होती.

शनिवारी दुपारच्या सुमारास चिंदर माळरानावर अचानकपणे आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आणि वाढलेल्या सुक्या गवतामुळे आगीने रौद्ररुप धारण केले, आग चिंदर माळरानावर पसरत चालली होती. आंबा, काजूबागा माडबागायती जळून खाक झाल्या आहेत. चिंदर येथील स्थानिक ग्रामस्थ यांनी जीव धोक्यात घालून मिळेल त्याने आग विझवत आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले होते आग विझविण्यासाठी बाबू हडकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, मनोज हडकर, देवेंद्र हडकर, तलाठी व्ही व्ही कंठाळे, जितू पांगे, राजू गावकर यांच्या समवेत अन्य ग्रामस्थ आग विझवत होते मात्र आग आटोक्यात येत नव्हती यावेळी मिलिंद पाटील, प्रदीप वायंगणकर, निलेश परब, धनंजय आचरेकर, राजा कांबळी यांनी ट्रॅक्टर च्या सहाय्याने पाणी आणून फवारणी करण्याच्या पंपाने आगीवर पाण्याचा मारा सुरू करत आगीवर ताबा मिळवत इतर बागांचे होणारे नुकसान त्यामुळे टळले. यात पावसकर, विनोद चौबे, तिरोडकर,प्रकाश हडकर आदी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा