You are currently viewing 1 ते 6 जुलै या कालावधीत कोकण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता

1 ते 6 जुलै या कालावधीत कोकण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता

1 ते 6 जुलै या कालावधीत कोकण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग 

३० जून २०२६ च्या भारतीय हवामान विभागाच्या बुलेटीन नुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण दरम्यान पसरली आहे. सदर कारणामुळे दि.१ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत कोकण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार ‘ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

                प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून दि. ०१ जुलै २०२६ रोजी प्राप्त हवामान अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात           दि. १ जुलै २०२६ रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट, दि.२ जुलै २०२६ रोजी यलो अलर्ट व दि.३ ते ५ जुले २०२६ या कालावधीत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. दि.१ ते जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी कळविले आहे

सततच्या पडणा-या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी

१) मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.

२) अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका.

३) घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या.

४) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रीक वस्तूंपासून दूर रहावे, अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

५) मुसळधार पावसाच्या वेळी जनावरांना गोठ्यात सुरक्षित ठेवावे.

६) भातशेती व भाजीपाल्याच्या रोपवाटिकांमधून अतिरिक्त पाणी बाहेर काढावे.

७) मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

अ.क्र.

नियंत्रण कक्ष

संपर्क क्रमांक

1

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग

(०२३६२) २२८८४७ किंवा टोल फ्री १०७७७४९८०६७८३५

2

जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष

(०२३६२) २२८६१४/ ८२७५७७६२१३ पोलीस विभाग टोल फ्री हेल्पलाईन ११२

3

जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग

०२३६२/२२८९०१

4

महावितरण, सिंधुदुर्ग नियंत्रण कक्ष

७८७५७६५०१9

5

दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष

(०२३६३) २5६5१८/ ७५५८६७३4६८

6

सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष

(०२३६३) २७२०२८/९४२०९१४५२४

7

वेंगुर्ला तालुका नियंत्रण कक्ष

(02366) 262053/9420851805

8

कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष

(०२३६२) २२२५२५/८२७५२२३१42

9

मालवण तालुका नियंत्रण कक्ष

(०२३६५) २५२०४५/९४०5४४९३7०

10

कणकवली तालुका नियंत्रण कक्ष

(०२३६७) २३२०२५/९४२2७४६९०६

11

देवगड तालुका नियंत्रण कक्ष

(०२३६४)२६2204/८८५७८३7204

12

वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष

(०२३६७) २३७२३९/८८३०4६२१८२

8)  हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संक्रनस्थळावरून घ्या.

९) कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करुन घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२/२२८८४७ किवा दाल फ्रां १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा

१०) हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नार्गारिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा