You are currently viewing प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आयआरडीपी खालील मच्छीमार कुटुंबांसाठी

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आयआरडीपी खालील मच्छीमार कुटुंबांसाठी

मालवण :

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात असून, पावसाळी हंगामातील मच्छीमारी बंद कालावधी साठी प्रत्येक मच्छीमार सदस्याला ३ हजार रुपये आर्थिक अनुदान मत्स्य विभागाकडून दिले जाणार आहे.

या योजनेसाठी बँक पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड, प्रत्येकी ६ झेरॉक्स व ग्रामपंचायतीकडील दारिद्र रेषेखालील दाखला, सोसायटीकडील क्रियाशील मच्छिमार असल्याचा दाखला, प्रत्येकी १ मूळ प्रत व त्याच्या ५ झेरॉक्स अशाप्रकारे बंच करून परिपूर्ण प्रस्ताव मच्छीमार व्यवसायिकांनी ज्या मच्छीमार संस्थेचे सभासद आहेत. त्या संस्थेत सादर करायचे आहेत.

हा प्रस्ताव संस्थेमार्फत मत्स्य विभाग कार्यालयात दाखल केला जाणार असून शासन स्तरावर सर्व कागदपत्रांची तपासणी होऊन पात्र मच्छिमार व्यवसायिकांना शासनाच्या मच्छीमारी बंदी कालावधीत ३ हजार रुपये सानुग्रह अनुदान दरवर्षी दिले जाणार आहे. एकाच कुटुंबातील १८ ते ६० वयोगटातील सर्वांचे प्रस्ताव स्वीकारले जातील.

परंतु, आता स्विकारलेले प्रस्ताव अनुदान हे चालू मासेमारी बंदी कालावधीसाठी मिळणार नसून पुढील वर्षाच्या मासेमारी बंदी कालावधीपासून सुरू होणार आहे. याची नोंद घ्यावी. या योजनेचा जास्तीत जास्त मच्छीमार बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 1 =