You are currently viewing SBI च्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त फोंडाघाट शाखेत ग्राहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

SBI च्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त फोंडाघाट शाखेत ग्राहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

SBI च्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त फोंडाघाट शाखेत ग्राहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

शाखा व्यवस्थापक पप्पू गुप्ता यांच्या ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीचे अजित नाडकर्णी यांच्याकडून कौतुक; सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा

फोंडाघाट

भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त फोंडाघाट शाखेत ग्राहकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाखा व्यवस्थापक पप्पू गुप्ता यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी शाखेला भेट देत शाखा व्यवस्थापक पप्पू गुप्ता यांचा सत्कार केला. ग्राहकाभिमुख सेवा, बँकेच्या विस्तारासाठी केलेले प्रयत्न आणि सर्वसामान्यांशी जपलेले आपुलकीचे नाते याबद्दल त्यांनी गुप्ता यांचे विशेष कौतुक केले. “अशा प्रकारचे ग्राहकाभिमुख उपक्रम इतर बँकांनीही राबवावेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच फोंडाघाट शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचेही नाडकर्णी यांनी अभिनंदन करून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल धन्यवाद दिले. ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या कार्यामुळे फोंडाघाट शाखा निश्चितच अधिक नावारूपाला येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा