राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मानयोजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचेआवाहन
सिंधुदुर्गनगरी
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना” अंतर्गत सन 2026-2027 या वर्षासाठी साहित्य क्षेत्रातील योगदान आणि कलाकार जे प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात (Performing art) सादरीकरण करणारे आहेत. अशा 100 कलाकारांची निवड करुन प्रती महिना 5 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 01 ते 31 जुलै, 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज आपले सरकार पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेस्थळावर भरावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जयप्रकाश परब यांनी केले आहे.
या योजनेसाठी लाभार्थी पात्रता याप्रमाणे- 1. ज्यांचे वय 50 पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षाने शिथिल करण्यात येत आहे. (दिव्यांगांना वयोमर्यादा 40 वर्षे राहील), 2. ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी 15 वर्षे असणे आवश्यक, 3. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जदार व मोलाची भर घातली आहे. 4. वयाने जेष्ठ असणारे, विधवा/परितक्त्या/दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहिल. 5. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 60 हजार पेक्षा जास्त नसावे. 6. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे, असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार. 7. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भुत नसलेले पात्र कलाकार. 8. कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. 9. शासनाकडील मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशमुर्तीकार ही कला शिल्पकला या प्रकारात मोड असल्याने असे कलाकार या योजनेसाठी अपात्र आहेत.
ऑनलाईन अर्जा सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे : 1. लाभार्थी यांचा पती-पत्नीचा एकत्रीत फोटो (लागू असल्यास) 2. जन्मतारखेचा दाखला, 3. आधारकार्ड, 4. उत्पन्नाचा दाखला (माहे मार्च 2027 पर्यंत वैध असणे आवश्यक), 5. रहिवासी दाखला, 6. इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरीकडे केलेले प्रमाणपत्र, 7. बँक पासबुक झेरॉक्स (बँक खाते क्रमांक व बँकेचा IFSC कोड क्रमांक स्पष्ठ दिसणे आवश्यक, 8. दिव्यांग दाखला (लागू असल्यास शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र) 9. राज्य/केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र, 10. नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारस पत्र. 11. रेशन कार्ड । सातबारा (शासकीय कागदपत्रात नाव असणे आवश्यक), 12. लाभार्थी ज्या कलेचा उल्लेख केला त्या कलाक्षेत्रातील सहभागाबाबत पुरावे (फोटो/सहभाग प्रमाणपत्र).