परुळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. प्राजक्ता पाटकर यांची निवड झाल्याबद्दल परीट समाजाच्या वतीने सत्कार
सिंधुदुर्ग
परुळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. प्राजक्ता प्रसाद पाटकर यांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार करण्यात आला या वेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले सौ. पाटकर मॅडम आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी व यशाचे सर्वोच्च शिखर आपण गाठावे ही ईश्वर चरणी प्रार्थना तसेच या सत्काराला उत्तर देताना सौ. पाटकर मॅडम म्हणाल्या परीट समाजाने केलेला माझा हा सत्कार मी कधीही विसरू शकत नाही आणि मी परीट समाजाच्या कार्यात आपल्याला सर्वोतोपारी मदत करेन अशी ग्वाही दिली.
यावेळी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर, जिल्हा सेक्रेटरी अनिल शिवडावकर, जिल्हा सह सेक्रेटरी गुरुनाथ मडवळ, सावंतवाडी चे तालुकाध्यक्ष राजू भालेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष सदा अनावकर, जेष्ठ मार्गदर्शक संजय कुडाळकर, प्रदेश सदस्या सौ. सविता कुडाळकर, महिला सदस्या सौ. अनुष्का शिवडावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते
