You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन सत्र

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन सत्र

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन सत्र

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल येथे मंगळवार, दिनांक 23 जून 2026 रोजी तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी विद्यार्थ्यांना पोक्सो (POCSO) कायद्याची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच लैंगिक अत्याचाराचे प्रकार, त्यापासून संरक्षणाचे उपाय आणि कायदेशीर तरतुदी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांचे वाढते स्वरूप, त्याविषयीची खबरदारी तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी ॲड. पूजा जाधव, ॲड. प्रिया भावे, ॲड. हरी वराडकर तसेच कनिष्ठ लिपिक श्री. अनुज साळुंखे उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संचालक श्री. दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त करून कार्यक्रमाचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा