You are currently viewing फोंडाघाटमध्ये वटसावित्री पूजन उत्साहात; महिलांची नवीन वडाच्या झाडाची मागणी

फोंडाघाटमध्ये वटसावित्री पूजन उत्साहात; महिलांची नवीन वडाच्या झाडाची मागणी

फोंडाघाटमध्ये वटसावित्री पूजन उत्साहात; महिलांची नवीन वडाच्या झाडाची मागणी

राष्ट्रीय महामार्ग विस्तारामुळे झाड हटविले जाण्याची शक्यता; पुढील वर्षी पूजेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे अजित नाडकर्णी यांचे आश्वासन

फोंडाघाट

फोंडाघाट हवेलीनगर येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोरील वडाच्या झाडाजवळ वटसावित्री पूजनाचा कार्यक्रम आज उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि सात जन्म हाच पती लाभावा, अशी प्रार्थना केली.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संजना आग्रे उपस्थित होत्या. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे हे वडाचे झाड हटविले जाण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी वटसावित्री पूजेसाठी पर्यायी वडाचे झाड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी उपस्थित महिलांनी अजित नाडकर्णी यांच्याकडे केली. या मागणीला कोरगावकर मॅडम, साटम मॅडम, भोगले मॅडम यांच्यासह अनेक महिलांनी पाठिंबा दिला.
यावर अजित नाडकर्णी यांनी पूजेसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पुढील वर्षी वटसावित्री पूजनानिमित्त सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजनही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा