You are currently viewing बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ 28/6/26’ मोहिमेचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शुभारंभ

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ 28/6/26’ मोहिमेचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शुभारंभ

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ 28/6/26’ मोहिमेचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शुभारंभ

बांदा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांच्या शुभहस्ते बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026’ चा अधिकृत उद्घाटन दीप प्रज्वलन करून सकाळी 8 वाजता पोलिओ डोस पाजून शुभारंभ उत्साहात संपन्न झाला.
या उद्घाटन कार्यक्रमास बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती प्रियांका पर्शूराम नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देणे अनिवार्य आहे. कोणत्याही बालके पोलिओ डोस पासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. प्रा केंद्र अंतर्गत एकूण 25 बूथ,2 मोबाईल टीम 1 ट्रांजिस्ट टीम असे नियोजन असून एकूण 957 लाभार्थ्यांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांनी उपस्थित पालकांना आपल्या पाल्यांना पोलिओचे डोस देऊन त्यांना सुरक्षित करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांच्यातर्फे पोलिओ डोस लाभार्थी बालकांना खाऊवाटप देण्यात आले
मा. डॉ. रमेश कर्तस्कर ,तालुका आरोग्य अधिकारी सावंतवाडी व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन सारंग , डॉ. कुबल मॅडम प्रा केंद्र निरवडे श्री. आर. आ.र ठाकूर , जिल्हा पर्यवेक्षक, श्री .शंकर परब ,तालुका पर्यवेक्षक, श्री. अरुण गवस, तालुका आरोग्य कार्यालय प्रतिनिधी, श्री. एस. एस. वेटे, आरोग्य सहाय्यक , श्रीम.तेजस्वीनी माजगांवकर , समुदाय आरोग्य् अधिकारी मडूरा, श्री दिनेश देसाई, कनिष्ठ सहाय्यक , श्रीम. मृणाली कदम ,आरोग्य सेविका व श्रीम.अर्चना गोन्साल्विस ,एन.सी.डी. स्टाफ नर्स व इतर प्रा. आ. केंद्रातीलf कर्मचारी उपस्थित होते, आणि आशा स्वयंसेविका व लाभार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
या मोहिमेत आशा स्वयंसेविका मोलाची भूमिका बजावत आहेत. या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी होऊन बांदा परिसरातील नागरिकांनी आपल्या बालकांना लवकरात लवकर पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी केले.
आशा स्वयंसेविका मोलाची भूमिका बजावत आहेत. या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी होऊन बांदा परिसरातील नागरिकांनी आपल्या बालकांना लवकरात लवकर पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा