You are currently viewing चैतन्य आणि नाट्यतुषार या दोन संस्थांना साई फाउंडेशनचा “सेवा गौरव पुरस्कार” जाहीर

चैतन्य आणि नाट्यतुषार या दोन संस्थांना साई फाउंडेशनचा “सेवा गौरव पुरस्कार” जाहीर

ठाणे :

ठाण्यातील साई फौंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनी मानाचा सेवा गौरव पुरस्कार 2026, हा सन्मान ठाणे जिल्ह्यातील चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाट्यतुषार या नामांकित दोन सामाजिक सेवाभावी संस्थांना एकत्रितपणे मिळणार आहे. हा पुरस्कार रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी अकरा वाजता ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात दिला जाणार आहे. हा पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. चैतन्य संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट रुपेश पवार आहेत तर नाट्यतुषार संस्थेचे सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गोसावी आहेत. ही दोन व्यक्तिमत्व ठाणे शहरातील सामाजिक साहित्यिक वर्तुळात आपल्या कार्याने लोकप्रिय आहेत.

चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था 2018 च्या डिसेंबर महिन्यात प्रस्थापित झाली परंतु लॉकडाऊनमुळे 2024 ला या संस्थेने मोठ्या प्रमाणात नाट्य तुषार संस्थे सोबत सामाजिक, शैक्षणिक, इतिहास विषयक कार्याला सुरुवात केली. नाट्य तुषार ही संस्था कलात्मक सांस्कृतिक संस्था आहे त्याचबरोबर ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्यामुळे या दोन नामांकित संस्थांनी एकमेकांना सहाय्य करत सामाजिक कार्यातील भगवी पताका फडकवत ठेवली आहे.

गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देण्याकरता या दोन संस्थांनी शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. त्याचबरोबर दिवाळी अंक निर्मात्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या दोन संस्थांनी दिवाळी अंक पुरस्कार योजना काढली आहे. पुस्तक प्रकाशनाचा साहित्यिक कार्यक्रमही त्यांनी केला आहे. वंचित, निराधार ज्येष्ठ नागरिकांकरता त्यांनी कार्यक्रम घेतले आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी या दोन संस्था नेहमी कार्यरत असतात. त्यामुळे समस्त ठाणेकरांनी या कार्यक्रमाला येऊन आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावेत. असे आवाहन या दोन संस्थांकडून केले गेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा