*विधानसभेतील शोकप्रस्तावावर ज्येष्ठ कवी श्री मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”शोक प्रस्ताव”*
तेजोमय सूर घेऊनी
जन्मल्या”आशा,लता”
हृदयस्थ ज्यांचे स्थान येथे
अमर जाहली,त्यांची कथा. /१/
मधाळ स्वरांनी भारलेला
कंठ लाभला “आशाचा ‘
गायकीच्या सम्राज्ञीला
प्रश्न न पडला” भाषांचा “. /२/
अभिजात “मराठी ” मातृभाषा
लखलखणारा “सुवर्ण साज ”
मात्र येथे” हत्या ” केली
उच्च पदस्थ व्यक्तीने आज. /३/
देवतांची “मैफिल” सजविण्या
निघून गेली ” स्वर आशा”
“शोक प्रस्ताव” वाचन समयी
अभिजात मराठी “लज्जित” आज/४/
सभा स्थानी उच्च पदांवर
मान न राखिला “भाषेचा ”
दृष्टीसही ना आणून दिधले
हा प्रश्न पडे,त्या श्रोत्यांचा /५/
सोडूनी द्यावा उद्योग यांनी
मूर्ख बनवण्या जनतेला
मायमराठी, राज्य मराठी
सन्मान देऊया भाषेला. /६/
स्व.आशा भोसले यांच्या निधनानंतर राज्य शासनाने ” शोक प्रस्ताव” सादर केला… अतिशय वेदनादायक… शब्द शब्द छिन्नविछिन्न होतांना,ऐकतांना कींव कराविशी वाटली…
चुकून कुणाचं मन दुखावलं असल्यास क्षमस्व….
रचना:- मोहन मराठे.
