*श्रीशब्द लालित्य समूह तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सदस्या लेखिका कवयित्री सौ.छाया नारिंगणेकर लिखित अप्रतिम ललित लेख*
*आकाश नक्षत्रांनी उजळून यावे*
साहित्याच्या अथांग नभांगणात, काही तारे असे तेजस्वी असतात,ज्यांच्या केवळ अस्तित्वानेच अवघ्या परिघाला एक स्वर्गीय उजळता प्राप्त होतो. कोकणच्या पावन,निसर्गदत्त आणि सांस्कृतिक मातीत रुजलेले, मराठी सारस्वताच्या दरबारात आपल्या अद्वितीय प्रतिभेने दीपस्तंभा सारखे उभे राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय कविवर्य दीपक पटेकर..!
आज त्यांचा वाढदिवस…. अक्षरांच्या या असीम पूजकाचा…. साहित्याच्या एका उपासकाचा….
नुकताच त्यांच्या ‘बकुळ फुले’ या रसरशीत सुहासिक काव्यसंग्रहाला लाभलेला राज्यस्तरीय तितिक्षा पुरस्कार म्हणजे…त्यांनी अक्षरांच्या मखरात मांडलेल्या भावफुलांचा आणि त्यांच्या अखंड तपश्चर्येचा झालेला एक देखणा, यथोचित गौरव आहे…. दीपकजी हे केवळ लेखक नाहीत, तर ते या शब्द कलेचे निस्सिम उपासक आहेत. त्यांच्या लेखणीतून उतरणारे शब्द म्हणजे शारदेच्या चरणी अर्पिलेली पुष्पेच..! त्यांच्या कविता ह्या मुक्तछंदाच्या स्वैर, मोकळ्या वाटांवरून फिरताना त्यांची लेखणी जितकी सहज आणि तरल वाटते, तितकीच ती जेव्हा वृत्ताच्या चौकटीत ‘नृत्यबद्ध’ होऊन पैंजण वाजवू लागते. नादमय गजलेपर्यंतचा हा प्रवास म्हणजे त्यांच्या प्रतिभेचे लेणे आहे.
काव्यासोबतच ‘ललित लेखन’ हा तर त्यांचा खरा हातखंड,… ललित साहित्याच्या प्रांतात त्यांची लेखणी जेव्हा रुंजी घालू लागते, तेव्हा वाचकाच्या मनाचा कोपरान कोपरा हळवा होतो. रोजच्या जगण्यातल्या साध्या प्रसंगातून…निसर्गाच्या पानावरील दवबिंदूतून… आणि कोकणच्या मातीतील ओलसर सुवासातून …ते जे लालित्य उभे करतात ते थेट काळजाचा ठाव घेते. अत्यंत समृद्ध,आशय गर्भ,आणि सोबतीला असलेली अलंकारिक, प्रभावी भाषाशैली, यामुळे त्यांचे इतर वैविध्यपूर्ण लेखनही वाचकाला खिळवून ठेवते.
आज जेव्हा ते,:सावंतवाडी मराठी कोकण साहित्य परिषद’ या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत, तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचा आणि कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक, परंपरेचा झेंडा अधिकच डौलाने फडफडत आहे. साहित्याची ही अविरत सेवा आणि त्यांचा हा समृद्ध प्रवास पाहताना अभिमान वाटतो.
आज या मंगल समयी वाढदिवसाच्या सुवर्णक्षणी दीपकजीना मनापासून उदंड आयुष्य आणि आरोग्याच्या ललित्यमय शुभेच्छा. बकुळ फुल चा हा सुवास असाच दाही दिशांना दरवळत राहो. त्यांच्या लेखणीचे हे अमृत अखंड पाझरत राहो. आणि त्यांच्या उत्तुंग प्रतिभेने अवघे आकाश नक्षत्रांनी उजळून यावे.. मनःपूर्वक शुभेच्छा
सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
7066998796
_________________________
*संवाद मीडिया*
*🎓 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संस्था*
*✨ श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) ✨*
*📚 सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित*
🏛️ मुंबई विद्यापीठ संलग्न
🏆 Best College Award (Rural) – University of Mumbai
🏅 NAAC “A” Grade (CGPA 3.06)
📜 ISO 9001:2015 प्रमाणित
🌟 अग्रणी महाविद्यालय – मुंबई विद्यापीठ
*🎯 शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेश सुरू*
——————————
*🎨 कला शाखा (B.A.)*
✔ इंग्रजी
✔ मराठी
✔ हिंदी
✔ अर्थशास्त्र
✔ भूगोल
✔ मानसशास्त्र
*🎓 एम. ए.*
✔ इंग्रजी
✔ हिंदी
✔ भूगोल
*🎓 पीएच.डी.*
✔ इंग्रजी
✔ हिंदी
✔ अर्थशास्त्र
—————————–
*💼 वाणिज्य शाखा*
📘 B.Com.
*✔ वाणिज्य*
🏦 B.Com. (Banking & Insurance)
*🎓 M.Com.*
✔ Advanced Accountancy
——————————–
*🔬 विज्ञान शाखा (B.Sc.)*
✔ रसायनशास्त्र
✔ वनस्पतीशास्त्र
✔ प्राणीशास्त्र
✔ भौतिकशास्त्र
✔ गणित
✔ Data Science
*🎓 M.Sc.*
✔ Computer Science
✔ IT
✔ रसायनशास्त्र
✔ वनस्पतीशास्त्र
✔ प्राणीशास्त्र
✔ भौतिकशास्त्र
*🎓 पीएच.डी.*
✔ रसायनशास्त्र
✔ वनस्पतीशास्त्र
✔ प्राणीशास्त्र
✔ भौतिकशास्त्र
—————————-
*🌟 महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
✅ स्वायत्त महाविद्यालय
✅ संस्थानकालीन भव्य वास्तू व प्रशस्त इमारत
✅ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
✅ संशोधन केंद्र व पीएच.डी. मार्गदर्शक उपलब्ध
✅ नवोपक्रम व नवसंशोधन विभाग
✅ रोजगार व कौशल्य विकास केंद्र
✅ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
✅ लोककला व सांस्कृतिक विभाग
✅ सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका
✅ अत्याधुनिक प्रयोगशाळा व Computer Lab
✅ Language Lab
✅ मुलींसाठी वसतिगृह सुविधा
✅ अद्ययावत Gym व Shooting Range
✅ NSS | NCC (Army & Navy)
✅ DLLE | Career Katta
—————————-
*📸 विशेष Certificate Courses*
🎥 Photography
🇫🇷 French Language
🤖 Artificial Intelligence (AI)
——————————
*📞 प्रवेशासाठी संपर्क*
*🎨 कला विभाग*
📱 डॉ. सौ. पी. जी. नाईक *– 9422374329*
📱 डॉ. एस. एम. बुवा – *9422810226*
*🔬 विज्ञान विभाग*
📱 डॉ. जी. एस. मर्गज – *9420209013*
📱 डॉ. डी. बी. शिंदे – *7066175697*
*💼 वाणिज्य विभाग*
📱 डॉ. एस. ए. देशमुख – *7875582850*
📱 डॉ. सौ. एस. जे. जाधव – *9922771024*
*👨🏫 प्राचार्य*
*श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त)*
*✨ उज्ज्वल भविष्याची खात्री… गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा! ✨*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204513/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
