You are currently viewing शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बांदा गावस्तर समितीची बैठक

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बांदा गावस्तर समितीची बैठक

बांदा

शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात रहावेत यासाठी १ते १०मार्च २०२१या कालावधीत राबवावयाच्या शोधमोहिमेसाठी बांदा गावस्तर समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची बैठक पार पडली या समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच अक्रम खान तर सहअध्यक्ष म्हणून बांदा नं १ शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांची निवड करण्यात आली या कमिटीत सदस्य म्हणून पोलिस पाटील प्रमोद देसाई, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामसेवक दिपक अमृतसर,आरोग्यसेवक राजन गवस, अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, आशासेविका कामिनी कुडव,सावली कामत शिक्षणतज्ज्ञ म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका अनुराधा धामापूरकर, बालरक्षक शिक्षक म्हणून जे.डी.पाटील व सेवाजेष्ठ शिक्षक बांदा मुख्याध्यापक सरोज नाईक यांची निवड करण्यात आली आली.
या सभेला बांदा गावातील बांदा नं.१,निमजगा,पानवळ व सटमट या प्राथमिक शाळांचे शिक्षक, केंद्र प्रमुख संदीप गवस, सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका, आशा सेविका व कमिटी सदस्य उपस्थित होते. यावेळी शिक्षक देवेंद्र अहिरे यांनी शासन परिपत्रकाचे वाचन केले. या वेळी सरपंच अक्रम खान यांनी ही शोधमोहिम यशस्वी राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहूया असे सांगितले या सभेचे सूत्रसंचालन श्री जे.डी. पाटील यांनी केले तर आभार श्री शरद राऊळ यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा