You are currently viewing मुंडे वळवून जातात मान

मुंडे वळवून जातात मान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मुंडे वळवून जातात मान*

रोजच बसतो वाचीत येथे
उलटून गेली *पंचाऐशी*
कथा वाचून *निघून गेले*
चि.वि.आणि अनंत जोशी

सांगत होतो *त्यांना मी*
ऐका माझी कथा व्यथेची
पळत सुटले ऐकून विनंती
नोंद आहे “बखरेत” त्याची

संसार माझा भव्य दुकानी
पाहून घालती तोंडात बोट
कधीही यायचे महोपाध्याय
बदलून जायचे धोतर कोट

वाचून झाले “धनुष्य” माझे
मागतात पोरी घरी न्यायला
झेपणार नाही स्पष्ट सांगतो
चहाड्या सांगतात दादाला

मागाल ते ते आहे “पुस्तक”
NEET सुध्दा जाल तरून
नका येऊ द्यायला “मिठाई”
मार्क मिळवा “पोट भरून”

कृपा करा “फक्त थोडीशी”
लक्षात ठेवा टपरी छोटीशी
तुकाराम पण जातो सांगून
ठेवणार टपरी “आहे तशी”

जागून सरस्वतीला एखादा
देतो कधीतरी प्रसाद छान
लक्षात ठेवून पुस्तक मदत
कोळसे जातात वळवून मान

विनायक जोशी 🖋️ठाणे
मोबाईल/९३२४३२४१५७

प्रतिक्रिया व्यक्त करा