You are currently viewing डोळे…

डोळे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधा गर्दे लिखित अप्रतिम लेख*

 

*डोळे….*

 

डोळे म्हणजे न बोलता, सारे काही सांगणारे पुस्तक. डोळे म्हणजे आत्म्याचा आरसा. त्यावरून एक गाणं आठवलं.

 

“ये ऑंखे मेरी दिलं की ज़ुबान हैं….”

 

जसा स्पर्श अनुभवून आपण व्यक्तीला काय म्हणायचं आहे हे ओळखू शकतो तसंच डोळ्यात बघितलं की समोरच्याला काय सांगायचं ते कळतं‌.

डोळे मोठे वटारले की राग, फक्त मोठे डोळे आश्चर्य, डोळे किलकिले समोरच्याला समजण्याचा प्रयत्न, करुणायुक्त डोळे काही तरी दु:ख दडवून ठेवलंय, खट्याळ डोळे बदमाशी चाललेली मनात, असे अनेक भाव डोळे न बोलता सांगत असतात.

 

आता ह्या डोळ्यांचे ही बरेच रंग असतात. या रंगावरून तज्ञ, माणसाच्या त्या स्वभावाचा ही मागोवा घेतात जो दुसऱ्यांना तर नाहीच कळत पण अनेकदा त्या व्यक्तीला ही माहिती नसतो. तर चला तज्ञांनी शोध करून डोळ्यांच्या वेगवेगळ्या रंगावरून माणसाचे कसे आकलन केले आहे ते पाहूया.

 

गहिरे काळे:– ही माणसं जन्मजात लीडर असतात. हीच क्वालिटी त्यांचं आत्मविश्वासी आणखी दुसऱ्यांपेक्षा वेगळं असे व्यक्तिमत्व तयार करते‌. लोकं यांच्यावर विश्वास ठेवतात आणि निर्भरही राहतात. ही लोकं दयाळू आणि मदतगार असतात‌. आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करतात. जीवनाप्रती यांची प्रेॅक्टिकल अप्रोच असते. मैत्रीही लवकर करतात तरीही आपल्या गोष्टी दुसऱ्यां समोर उघड करत नाहीत.

 

भुरकट रंग:— ही माणसं केयरिंग असतात. मस्तीत जगणारी आणि कोणती ही गोष्ट सोप्या पद्धतीने करणारी. सौम्य स्वभावाची असतात. मैत्री लगेच होते यांची. मदतीस तत्पर असतात. स्वतंत्र विचारांचे, आत्मविश्वासू आणि दृढनिश्चयी असतात. आपल्या मनातील गोष्टी न सांगता, आपल्या समस्या बाजूला सारून ही माणसं दुसऱ्यांना मदत करतात हीच यांची कमजोरी असते.

 

हेजल रंग:— सकारात्मक स्वभाव. एडवेंचर आवडणारे, आणि रूटीन लाईफस्टाईलला नापसंत करणारी असतात ही माणसं. बोल्ड आणि हिंमतीही असतात‌‌. राग मात्र नाकावर असतो. लवकर नवी मैत्री करतात आणि संपवतितात ही तितक्याच लवकर‌ पण खरा साथी मिळताच अख्खं आयुष्य सुखकर करतात.

 

ग्रे रंग:— ही माणसं नारळासारखी असतात. मनाने मृदू पण वरून कठोर. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफला गंभीरपणे बघतात. यांच्या वागण्याचा थांगपत्ता लागत नाही. जर डोळे हलक्या ग्रे रंगाचे असतील तर ही माणसं आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घेतात. यांच्यावर कोणीच सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत. ही माणसं प्रसन्न वातावरणाला कधीही खराब करू शकतात.

 

हिरवा रंग:— ज्यांच्या डोळ्यांचा रंग हिरवट असतो ते मजबूत आणि केयरिंग असतात. नवीन गोष्टींची माहिती काढणं आणि त्या करणं यांना अतिशय आवडतं. दुसऱ्यांना ही लोकं आवडतात. पण ही स्वतः ला विशेष समजतात आणि दुसऱ्यांशी ईर्षा करतात.

 

निळा रंग:— डोळ्यांचा निळा रंग असणाऱ्या लोकांना एका अद्भुत शक्तीचं वरदान मिळालेलं असतं. सगळ्यांना यांच्या बद्दल चुकीची समजूत असते. ते गर्विष्ठ आहेत असं सगळ्यांना वाटतं पण ही लोकं तशी नसतात.आपल्या भावना लपवून ठेवणारी असतात. यांचं व्यक्तीमत्व इंप्रेसिव असतं. ही लोकं शक्ती आणि ऊर्जेनी सळसळत असतात. तरीही कुठलंही काम करताना ती स्वतःचा बचाव करतात आणि हेच लोकांना खटकतं.

 

आता ही तज्ञांची मतं त्यांचे विचार मी आपल्या समोर मांडले आहेत. यात मी माझ्या पदरचं काही घातलं नाही. पटलं तर बघा नाही तर सोडा…..

 

राधा गर्दे

कोल्हापूर

प्रतिक्रिया व्यक्त करा