*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका , समाजसेविका, कथाकार, पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मन*
मन असतं विचित्र.
मन असतं विक्षिप्त.
मन असतं दयाळू.
मन असतं अलीप्त.
मन होत फूल.
मन होत पान.
मन होत झाड.
मन होत रान.
मन होत थेंब.
मन होत सागर.
मन होत रोप.
मन होतं आगर.
मन कधी होतं
पाऊस धुंवाधार.
मन कधी वाजवतं
शीळ हळूवार.
मला मात्र मनं
खंबीर हवं आहे.
वादळवाऱ्यातही जे
भक्कम उभं राहे.
अनुपमा जाधव
