_*भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ७ विद्यार्थ्यांची सीमेन्समध्ये निवड…..*_
सावंतवाडी
_यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ७ विद्यार्थ्यांची सीमेन्स या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. कंपनीतर्फे आयोजित पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ही निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध तांत्रिक चाचण्या आणि मुलाखतींमधून कॉलेजच्या ७ विद्यार्थ्यांनी अंतिम निवडीत स्थान मिळवले._
_ही निवड कंपनीच्या गोवा युनिटसाठी करण्यात आली. याठिकाणी उच्च दर्जाची इलेक्ट्रॉनिक व ऊर्जा व्यवस्थापन उत्पादने, फॅक्टरी ऑटोमेशन सिस्टीम्स, मायक्रोबॉक्स पीसी, प्रिंटेड सर्किट बोर्ड्स, स्विचगियर, प्रोटेक्शन रिले तसेच सबस्टेशन ऑटोमेशन उपकरणांचे उत्पादन केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कंपनीचे हे युनिट महत्वाचे मानले जाते._
_निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला वार्षिक साडेतीन लाखांचे पॅकेज देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले व टीपीओ हेड मिलिंद देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या._
