न जाणो का?

न जाणो का?

न जाणो का?

ती संध्याकाळ…
तुझ्या नी माझ्या,
प्रेमाची साक्ष होती.
तुझा तो पहिला स्पर्श…
अंगावर शहारे आणीत होता.
तुझा हात हाती घेऊन,
हळूच तुला कवेत घेत होतो.
तुझे डोके हृदयाशी बिलगताच,
हृदयाची धडधड वाढत होती.
संध्याकाळचा मंद वारा,
अंगाला गारवा देत होता.
निशब्द ओठ तुझे,
थरथर कापत होते.
जणू तुझे शब्द झेलण्या,
तेही आतुरले होते.
तुझ्या त्या मिठीत,
समर्पणाची भावना होती.
तरीही न जाणो का….?
या मनाला…
दुरावण्याची भीती होती.
न जाणो का???

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा