You are currently viewing सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी संदीपकुमार महाले
Oplus_16908288

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी संदीपकुमार महाले

कुडाळ :

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आंबडपाल, कुडाळ येथील कार्यालयाच्या कार्यकारी अभियंतापदी संदीपकुमार हिरामण महाले हे २ जून रोजी रुजू झाले असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. यापूर्वी संदीपकुमार महाले हे कार्यकारी अभियंता व पदसिद्ध अवर सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय येथे कार्यरत होते.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पावर सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यानंतर पदोन्नतीने ते कार्यकारी अभियंता म्हणून मंत्रालयात कार्यरत होते. मंगळवारी श्री. महाले यांनी कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महेंद्र डांबरेकर, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग सावंतवाडी यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी आकाश जाधव (सहाय्यक अभियंता श्रेणी १, पाटबंधारे उपविभाग कणकवली), प्रसाद कापडोसकर (आरेखक), महेंद्र मस्के (प्रथम लिपिक), राजू डाके (लिपिक टंकलेखक), उमेश रांजणकर (सहा. अभियंता श्रेणी २), शैलेश परब (कनिष्ठ अभियंता), संदीप यादव (लिपिक), अमृत देसाई (लिपिक), महेश आंदुर्लेकर (कनिष्ठ अभियंता), सुनील सुपल (लिपिक), आकाश चौरपगार (सहा. भांडारपाल) तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा