You are currently viewing सुप्रसिद्ध लेखिका पद्मश्री सुधा मूर्ती यांनी घेतले श्री देव कुणकेश्वराचे दर्शन

सुप्रसिद्ध लेखिका पद्मश्री सुधा मूर्ती यांनी घेतले श्री देव कुणकेश्वराचे दर्शन

देवगड :

 

कुणकेश्वर क्षेत्र येथे इन्फोसिसच्या माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखिका पद्मश्री सुधा मूर्ती यांनी भेट देऊन कुणकेश्वराचे दर्शन घेतले. सुधा मूर्ती या चार दिवसासाठी देवगड दौऱ्यावर असून बापर्डे येथील विद्यालयाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. देवगडात त्यांचे आगमन झाल्यावर त्यांनी काल श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकारीऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा