You are currently viewing आपण केली तेव्हा जिगर

आपण केली तेव्हा जिगर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आपण केली तेव्हा जिगर*

 

काळ सुखाचा आज आठवतो

तेव्हा होतीस तू सायकल क्वीन

असायची पोरे कितीक पाठी

दोस्ती होती आपली *नवीन*

१

घेऊनि भाड्याने तासावरती

गाठले होते *त्र्यंबकेश्वर*

नव्हते *ठाऊक* जरी घरी

विश्वास होता *आपल्यावर*

२

सायकल “डेचे” नव्हते फॅड

जायचो आपण डबल सीट

व्हायचा टायर “पंचर” कधी

उडायची मग “त्रेधातिरपीट”

३

पडून फुटायचे ढोपर कोपर

मारायचं *थाप* तेव्हा घरी

सांगून कारण कबड्डी खेळ

थापा मारायचो वरच्यावरी

४

असून साधी हरक्युलीसची

नव्हते कुठले गिअर बियर

बसून कधीतरी “चार जण”

आपण केली तेव्हा “जिगर”

५

विनायक जोशी 🖋️ठाणे

मोबाईल/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा