You are currently viewing शिरोडा वेळागर समुद्रात पर्यटक बुडाला

शिरोडा वेळागर समुद्रात पर्यटक बुडाला

शिरोडा वेळागर समुद्रात पर्यटक बुडाला

आंघोळीदरम्यान दुर्घटना; गडहिंग्लज येथील २१ वर्षीय युवकाचा शोध सुरू

वेंगुर्ले

शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एका युवकाचा समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २) सायंकाळी घडली. प्रणव देवमाने (वय २१, रा. गडहिंग्लज) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव देवमाने हा आपल्या मित्रासह वेळागर समुद्रकिनारी आंघोळीसाठी उतरला होता. यावेळी समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्यासोबत असलेला दुसरा पर्यटक मात्र पोहत किनाऱ्यावर परत येण्यात यशस्वी ठरल्याने त्याचा जीव वाचला.
घटनेची माहिती मिळताच शिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांपूर्वी शिरोडा केरवाडी येथील राजन सारंग यांची होडी पलटी होऊन समुद्रात बुडाल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शिरोडा परिसरात समुद्रातील दुर्घटनेची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा