You are currently viewing जलतरण

जलतरण

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका , समाजसेविका, कथाकार, पर्यावरण प्रेमी लेखिका कवयित्री अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जलतरण*

 

स्विमिंग पूल मध्ये पोहण्याची

मजा काही और.

कोणी मारतो उड्या

कोणी मारतो सूर.

 

 

कोणी जातो पोहत पोहत

पाण्याच्या आतून.

कोणी नुसता पाण्यावर

राहतो फक्त झोपून.

 

 

जोरजोरात हात मारत

कोणी पोहतो वेगात.

कोणी पोहतो खोल पाण्यात

कोणी उथळ भागात.

 

 

सुरवातीला पाण्याची

वाटत असते भीती.

नंतर पाण्यात डुबायचा

आनंद सांगावा किती!

 

स्विमिंग शिकून पाण्याशी

करुन घ्या दोस्ती.

नंतर कधीच राहणार नाही

बुडण्याची धास्ती.

 

 

स्विमिंग हा व्यायाम आहे

अगदी खणखणीत.

चाच्यामुळे तब्बेत आपली

राहते ठणठणीत.

 

 

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा