*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अधिक श्रावण मास…!*
भगवान विष्णूंकडे
याचे दैवी दायित्व
मास दातृत्व
अधिकाचे…!
आजपासून सुरू
अधिक श्रावण मास
योग खास
पुण्यकाळाचा…!
या महिन्यास
म्हणती “पुरुषोत्तम मास”
साधकांच्या दृष्टीस
महत्वाचा…!
विशेष उपासनेद्वारा
रहावे भगवंताच्या अनुसंधानात
जास्तीत जास्त
वेळ…!
अनेक संकल्प
ज्यामध्ये केले जातात
पठण करतात
विष्णूसहस्रनामाचे…!
गीतापाठ,अधिकाधिक
जप,आणि नामस्मरण
ग्रंथांचे वाचन
करावेच…!
चित्त शुध्दीसह
मन एकाग्र होई
सुदृढ होई
मन…!
आहार,विहाराचे
जर नियोजन केले
संकल्प फळे
सार्यांचाच…!
सर्वच बाबतीत
अधिक देणारा मास
असतो खास
अधिकाचा…!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
