You are currently viewing कराटे शिकल्या दोघीजणी

कराटे शिकल्या दोघीजणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कराटे शिकल्या दोघीजणी*

 

नका जाऊ कुणी रुपावर

नेसून आल्या सुती साडी

असून डावी “सरपंचबाई”

हाकते शर्यतीत बैल गाडी

1

घेऊन डोक्यावर “कपडे”

हास्य मुखी ती उंच गडे

आडवा करून पाटलाला

पाटील पळे घेऊन कपडे

2

घेऊन ताब्यात पंचायत

धुऊन काढले एकेकाला

मुकाट सारे खाली मान

सलाम करतात महिलेला

3

कपडे धुताना चर्चा गावची

रात्र सभेला पूर्ण उपस्थिती

करून गावात *दारूबंदी*

उपटून टाकली गांजा शेती

4

समजू नका कुणी ऐर्यागैर्या

गावच्या आहेत कारभारणी

खोचून कमरेस विळा नवा

कराटे शिकल्या दोघीजणी

5

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मोबाईल/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा