You are currently viewing मिळे कर्माचे ते फळ

मिळे कर्माचे ते फळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अष्टाक्षरी*

          “”””””””””””””

        *मिळे कर्माचे ते फळ*

***************

 

*नका करू कधी तुम्ही*

*संकटांचा गाजावाजा*

*योग्य मार्ग दाखवितो*

*माझा पंढरीचा राजा*।।१।।

 

*त्याला दोष नका देऊ*

*मिळे कर्माचे ते फळ*

*होवो कित्येक आघात*

*देई सहण्यास बळ*।।२।।

 

*जसा ऊन सावलीचा*

*खेळ चाले भूमीवर*

*सुख -दु:खे तयासम*

*येती जाती भराभर*।।३।।

 

‌. *नित्य ठेवावे अपुल्या*

*मुखी विठ्ठलाचे नाम*

*कष्ट करता अपार*

*गळे सुखाचाच घाम*।।४।।

 

*चौऱ्याऐंशी फेऱ्यातून*

*मिळे अमूल्य जीवन*

*विठ्ठलाचे नाम घेता*

*अंती होईल पावन*।।५।।

 

*नाम नामात विठ्ठल*

*मना मनात विठ्ठल*

*शक्ती विश्वाची विठ्ठल*

*राहे भरून विठ्ठल* ।।६।।

 

*******************************

*रचनाकार :-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*ठाणे:-* दिवा

 

🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸

प्रतिक्रिया व्यक्त करा