You are currently viewing वालावल चेंदवण कवठी ग्रामस्थांचा उद्रेक!

वालावल चेंदवण कवठी ग्रामस्थांचा उद्रेक!

वालावल चेंदवण कवठी ग्रामस्थांचा उद्रेक! आमच्या टु व्हिलरवर बसा आणि कवठी पर्यंत प्रवास करुन दाखवा! सा बा कुडाळ च्या अभियंता श्री शिंदे यांना चांगलेच खडसावले!

अखेर जि प सदस्य रुपेश पावसकर आणि पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांची मध्यस्थी!

कुडाळ (प्रतिनिधी)

वालावल ते चेंदवण कवठी गावातील शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले, रस्त्याची झालेली चाळण बघा आमच्या मोटार सायकल वरुन तुम्ही प्रवास करा तुम्हाला एसीत बसुन काय वाटत नाही आम्ही या रस्त्यामुळे आमची मुले कामावरुन येतात त्या मुळे अपघात होऊन आमच्या लोकांना आम्ही मुकणार ही मनामध्ये आमच्या भिती असुन तुम्ही हा रस्ता कधी करणार असा प्रश्नांचा भडिमार करत तुम्ही आमच्या पाठीमागे बसाच असा आग्रह धरला असता जि प सदस्य रुपेश पावसकर आणि पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी पुढाकार घेत अधिक्षक अभियंता श्री दीनेश बगुल यांच्या कडुन शब्द घेऊन संपूर्ण रस्ता कार्पेट मारुन घेण्याचा शब्द घेतला असता ग्रामस्थांनी रास्ता रोको थांबवले
वालावल ते चेंदवण कवठी रस्ता पुर्णतहा चाळण झाला असुन मंगळवार 12 रोजी वालावल सकाळी 9 वाजता आंदोलनाचा इशारा दिला असता आज सकाळ पासुन वालावल पोस्ट कार्यालयासमोर कवठी, चेंदवण वालावल, नेरुर, हुमरमळा येथुन आंदोलन कर्ते ग्रामस्थ जमु लागले असता निवती पोलीस निरीक्षक भिमसेन गायकवाड यांनी पोलीस कुमक वाढवत आंदोलन कर्त्यांना शांततेत सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची सुचना दील्या,
_*अतुल बंगे यांचा रुद्राअवतार _*!
यावेळी मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी सा बा चे शिंदे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत संपूर्ण रस्त्याची खडी उखडली आणि तुम्ही खड्डे बुजवून थुकपट्टि लावुन ग्रामस्थांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहात काय? अहो आमची मुले शाळेत जातात, तरुण आमचे नोकरी निमित्ताने कायम ये जा करतात रीक्षावाले रोज आपल्या पोटासाठी या रस्त्यावरुन आपली भाडी मारतात अशा सर्व लोकांचा जिव या रस्त्यामुळे धोक्यात आला आहे असे सांगून तुम्ही एसी गाडीतुन फिरतात तुम्हाला रस्ता खराब असल्याचे महत्त्व कळणार नाही असे सांगत आता पावसाळा जवळ आला तुमची पोकळ आश्वासने नको ठोस निर्णय द्या असे बंगे यांनी खडसावले,
_*जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांचा अधिक्षक अभियंता यांना फोन _*!
जि प सदस्य रूपेश पावसकर यांनी रत्नागिरी येथील अधिक्षक अभियंता श्री दीनेश बगुल यांना भ्रमणध्वनी करुन रस्ता खड्डे बुजवून सुस्थितीत होणार नसुन वालावल ते कवठी पर्यंत पुर्ण कार्पेट मारण्याची मागणी केली असता तशा प्रकारची तरतुद करुन कार्यवाही करु असे आश्वासन दीले व कार्यकारी अभियंता सौ इंगवले यांनी ही आपण शासनस्तरावर याबाबत त्वरित कळवत आहोत असे सांगितले
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर, पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, नेरुर जिल्हा परिषद शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, कवठी उपसरपंच सौ खडपकर, चेंदवण उपसरप निलेश माधव, कवठी मा सरपंच श्री रुपेश वाड्येकर, कवठी मा उपसरपंच श्री अरुण परुळेकर, चेंदवण प्रशांत तेंडुलकर, चेंदवण विजय मेस्त्री, चेंदवण शिवसेना उपविभाग प्रमुख संदीप नाईक, भुपेश चेंदवणकर, राजु पोयरेकर, हेमंत वालावलकर, रवि कावळे, आपा वालावलकर, दादु कोळंबकर, बाळा धुरी, विजय लाड, गजा शिरसाट, नागेश बंगे, विठ्ठल घारे, शामा सांगळे, महेंद्र तेली, रुपेश खडपकर, गजा कवठकर, गोविंद पेडणेकर, रवि तोरसकर आदी ग्रामस्थ महीला युवक आणि सर्व पक्षीय लोक सहभागी झाले होते

प्रतिक्रिया व्यक्त करा