*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गोदा तीर*
लाभले आम्हास भाग्य
जन्मलो गोदा तीरी
जप जाप्य नं त्रिकाल संध्या करता
दिवस लागतो सत कारणी
जन्म जन्मलो ह्या पवित्र भारत भूवर
त्याचा अभिमान मजला का नसावा
संचित हे गत जन्माचे
लाभले ह्या जन्मांतरी
जपजाप्य, अनुष्ठाने करुनी
घडो ईश सेवा मज हातूनी
भोई होऊन राहीन पालखीचा देवा
पुण्यसंचय घडो मज हातुनी
या जन्मी मज लाभले हे
लाभो जन्म जन्मांतरी
जन्मलो गोदा तिरी
अभिमान मज मनोमनी
निष्ठेने अनुष्ठान करिता
लाभते मनी प्रसन्नता
काय नि कसे च्या ह्या चक्रव्यूही
लाभो चिरकाल आम्हां शांतता
–राजा जोशी
9823687519
०६ मे २०२६
🚩 🚩 🚩 🚩 🚩
