शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगावची शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम
कुडाळ
येथील शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी संचलित साळगावच्या शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगावने शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखत सेमी इंग्रजी माध्यमाचा सलग १४ व्या वर्षी १००% निकाल लागला तर एकूण निकाल ९५.२३%एवढा लागला प्रशलेतून एकूण ४२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यालयात प्रथम कुमारी रसिका सूर्यकांत धुरी ९६.८०% द्वितीय कुमारी आर्या अशोक कोरगावकर ९६.६०% तर कु. निधी एकनाथ सावंत ९६.२०% गुणासह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.विशेष प्राविण्यसह २० विदयार्थी प्रथम श्रेणीत ०७तर द्वितीय श्रेणीत ०८ विद्यार्थी व तृतीय श्रेणीत ०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थी पालक, व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन संस्था कार्याध्यक्ष श्री मुकुंद धुरी , संस्था सचिव श्री प्रदिप प्रभुतेंडोलकर, मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार शिक्षक -पालक संघ उपाध्यक्ष श्री उमेश प्रभूतेंडोलकर, तसेच सर्व संस्था संचालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
