You are currently viewing परिमल भावनांचा

परिमल भावनांचा

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*परिमल भावनांचा*

~~~~~~~~~~

स्पंदनांचा गंधाळ निरागस

मुग्ध मनांतराला खुलवितो

 

अव्यक्त भावनांचा परिमल

हितगुज सारे सांगूनी जातो

 

उमजता अर्थ शब्दाशब्दांचा

काळजास प्रीतस्पर्श कळतो

 

जे जे घडणार आहे तेच घडते

तो भाळीचाच दैवयोग असतो

 

निरपेक्ष सत्कर्मातची जगावे

तोच ध्यास जीवाजीवा तारतो

 

*मानवता* जगण्याचा मूलमंत्र

या जन्माचे तोच सार्थक करतो

~~~~~~~~~~~~~~~

*©️वि.ग.सातपुते*

प्रतिक्रिया व्यक्त करा