You are currently viewing ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोची एसटीला जोरदार धडक

ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोची एसटीला जोरदार धडक

एडगांव नजीक अपघात : दोन्ही वाहनांचे नुकसान

वैभववाडी
एडगांव नजीक धोकादायक वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोने एसटीला जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात सकाळी 9.30 वा. च्या दरम्यान घडला आहे.

वैभववाडी मार्गे देवगड – अक्कलकोट एसटी (क्र. एमएच-14 बीटी – 2582) जात होती. दरम्यान कोल्हापूरहून कणकवली कडे (क्र.एमएच -43 वाय -1546) टेम्पो जात होता. करूळ – एडगांव हद्दीवर धोकादायक वळणावर टेम्पो एका ट्रक ला ओव्हरटेक करत असताना एसटीला जोरदार धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनांचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. एसटीतील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. सर्वांना पर्यायी एसटीने कोल्हापूरकडे पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =