*न्यायाधीश आणि न्यायालयीन व्यवस्था लोक कल्याणासाठी, विशेषतः गरीब आणि दुर्बल घटकांसाठी आधारस्तंभ – ॲड. सतिश गोरडे*
पिंपरी
आज शुक्रवार, दिनांक ०८ मे २०२६ रोजी पिंपरी – चिंचवड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालयातून दीपक डोंगरे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, व्ही. एन. गायकवाड व सौ. एम. ए. आवळे प्रथम वर्ग न्यायाधीश पिंपरी – चिंचवड यांचा निरोप समारंभ पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे यांनी, ‘न्यायाधीश आणि न्यायालयीन व्यवस्था लोक कल्याणासाठी, विशेषतः गरीब आणि दुर्बल घटकांसाठी आधारस्तंभ आहे. हे काम या तिन्ही न्यायाधीश यांनी त्यांच्या कारकिर्दीत उत्तम प्रकारे काम केले!’ असे गौरवोद्गार काढले.
व्यासपीठावर अति. जिल्हा न्यायाधीश एस. एस. नायर मॅडम, एस. एस. चव्हाण मॅडम, अल अमुदी,
श्रीमती जी. जी. औटी, के. के. वाघमारे,
श्रीमती ए. एल. आवटी,
श्रीमती पी. डी. पाटील,
श्रीमती एम. ए. आवळे, वी. एन. गायकवाड,
श्रीमती टी. एस. महाडिक, अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ॲड. सतिश गोरडे, ॲड. सुशील मंचरकर आदि उपस्थित होते.
दीपक यू. डोंगरे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचा सन्मान ॲड. गौरव वाळुंज यांनी भक्ती शक्ती प्रतिमा संत तुकाराम महाराज पगडी व उपरणे देऊन केला. तर व्ही. एन. गायकवाड यांचा सन्मान माजी अध्यक्ष ॲड. किरण पवार व ॲड. सुनील कडूसकर यांनी व सौ. एम. ए. आवळे प्रथम वर्ग न्यायाधीश पिंपरी – चिंचवड यांचा सन्मान ॲड. संगीता परब, ॲड. कांता गोर्डे, ॲड. सुजाता बीडकर यांनी केला.
यावेळी दीपक डोंगरे, ॲड. सुशील मंचरकर, अति. जिल्हा न्यायाधीश संध्या एस. नायर यांनी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रम नियोजन ॲड अनिल शिंदे, ॲड. अक्षय फुगे, ॲड. सोहेल शेख, ॲड. रवि मराठे, ॲड शंकर घगाळे, ॲड. प्रशांत सस्ते, ॲड. भूषण पाटील व ॲड. सुशांत गोरडे यांनी केले व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सूत्रसंचालन ॲड. मंगेश खराबे यांनी केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

