You are currently viewing आयशर टेम्पो व शिवशाही एसटीचा अपघात

आयशर टेम्पो व शिवशाही एसटीचा अपघात

ओसरगाव टोलनाक्यानजिकची घटना : कोणीही जखमी नाही

कणकवली :

दारुवाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोला शिवशाही एसटी बसने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. नॅशनल हायवेवर ओसरगाव टोलनाक्यानजिक मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातस्थळी फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. कुडाळच्या दिशेने जात असलेला आणि महाराष्ट्रीयन बनावटीची अधिकृत दारू वाहतूक करणारा आयशर टेम्पो ओसरगाव टोल नाक्यानजिक रत्स्याच्या कडेला उभा होता. पुण्याहून पणजी च्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही एसटी बसने उभ्या आयशर टेम्पोला मागून धडक दिली. धडकेनंतर टेम्पोतील दारूच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावर कोसळून फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच रस्त्यावर पडला होता. महामार्ग वाहतूक पोलीस आणि कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − thirteen =