*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गालावरची खळी*
तुझ्या गालावरची खळी
जराशी माझ्या गालावर येवू दे
तुझ्या खळीच हसणं
मलाही पाहू दे
तुझी जादूई खळी
माझ्या गालावर हसेल
तू मला सांगशील ना
कशी ती दिसेल
तुझ्या गालावरची खळी
माझ्या गालावर येईल
तुझ्या खळीचा हसणं
मी तुझ्या डोळ्यात पाहिलं
माझ्या गालावरची खळी बघून
तू हसत हसत येशील
तुझी हसरी खळी पाहून
तू रूसून जाशील
खळी तुझ्या गालावर
खूप छान दिसते
ती फक्त तुझ्या गालावरच
गोड गोड हसते
खरंच तुझ्या खळीच हसणं
क्षणभर माझ्या गालावर राहू दे
मलाही तुझ्यासारख
एकदा तरी हसु दे
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१८
