एमएचटी-सीईटी,2026 द्वितीय सामायिक परीक्षा
सिंधुदुर्ग नगरी,
एम एच टी-सीईटी 2026 द्वितीय सामायिक परीक्षा एमबीए/ एमएमएस /पीसीबी/पीसीएम गट परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन , मालवण, वायरी मालवण या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी कळविले आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र ,बी प्लॅनिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने एमएचटी-सीईटी 2026 द्वितीय सामायिक परीक्षा एमबीए एमएमएस गट दिनांक 09 मे 2026 रोजी, पीसीबी गट दिनांक 10 व 11 मे 2026 रोजी व पीसीएम गट दिनांक 12 ते 15 मे व दिनांक 19 व 20 मे 2026 या कालावधीत सकाळी 7.30 सायंकाळी 6.45 या वेळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन मालवण वायरी मालवण या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार आहे.
