*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कधीकाळी…!*
आकाशाच्या रंगपटलावर
काळीज रेखून पहावे
एकमेकांना जपावे
कधीकाळी…!
अर्थ आकळण्या
सहजीवन बहरून यावे
जगणे व्हावे
सुंदर…!
आकांक्षांचे पंख
लाभता विहरून यावे
लोभस व्हावे
फुलपाखरासम…!
येता काटे
कधीकाळी आपल्या मार्गात
असावे कुसुमात
हात…!
हात आपुला
एकमेकाच्या हाती असे
वाट होतसे
कोमल…!
काय उणे
राही कधी पुन्हा
अक्षयी खुणा
राहता…!
भाव समर्पित
वचन ठेवावे जपून
सांभाळलेले लपून
कधीकाळी…!
सौ.प्रज्ञा घोडके, चिंचवड,पुणे©®
