You are currently viewing ५ व्या राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलनाचे १० मे रोजी कुडाळ ‌येथे आयोजन

५ व्या राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलनाचे १० मे रोजी कुडाळ ‌येथे आयोजन

कुडाळ:

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने ५ वे राष्ट्रीय पर्यावरण संमेलन रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी ७.३० वाजलेपासून दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. हा भव्य कार्यक्रम जय वासुदेवानंद हाॅल, आर.एस.एम. हाॅटेलजवळ, उद्यमनगर, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

संमेलनाचे‌ उद्घाटन मा.सौ.निलम नारायण राणे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मा.सुयोग धस, संस्थापक अध्यक्ष मानवता विकास संस्था राष्ट्रीय अध्यक्ष हे राहाणार आहेत. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पर्यावरण प्रेमी उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सिनेअभिनेते तथा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर (NEFDO) जयरामजी नायर व‌ विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत.

या संमेलनात पर्यावरण संवर्धन, पर्यटन, हवामान बदल यासारख्या विषयांवर चर्चा होईल. वृक्षदिंडी मिरवणूक, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, पर्यावरण जागृती कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

पर्यावरण क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या पदाधिकारींचा सत्कार आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या सत्रात पर्यावरणावर मार्गदर्शन आणि पाहुण्यांची भाषणे होतील. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत पर्यावरण अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मालाड

पर्यावरण व मानवता विकास संस्था अध्यक्षा पल्लवी उमरे आणि मानवता विकास संस्थेचे वतीने देण्यात आली आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण पदाधिकारी झटत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा