You are currently viewing सावंतवाडीत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुलेमान बेग यांचे निधन

सावंतवाडीत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुलेमान बेग यांचे निधन

सावंतवाडीत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुलेमान बेग यांचे निधन; परिसरात हळहळ

सावंतवाडी

येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक आणि ‘जे. पी. रेफ्रिजरेशन अँड एअरकंडिशनिंग’ या दुकानाचे मालक सुलेमान कादर बेग (वय ७३) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुलेमान बेग यांनी शैक्षणिक क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली होती. ‘जहांगीर सर’ म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये परिचित होते. शिक्षणाबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील युवा उद्योजक सोहराब बेग यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा