You are currently viewing शेर्ले येथे तेरेखोल नदीकाठी गणेश घाट बांधकामाचा श्रीगणेशा

शेर्ले येथे तेरेखोल नदीकाठी गणेश घाट बांधकामाचा श्रीगणेशा

जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन; गणेश विसर्जनासाठी भाविकांना मोठी सोय होणार

सावंतवाडी (प्रतिनिधी):

शेर्ले येथील तेरेखोल नदीच्या पात्राजवळ बहुप्रतिक्षित गणेश घाट बांधण्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. या विकासकामाचे भूमिपूजन शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते उत्साही वातावरणात पार पडले.

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात सुसज्ज घाटाची गरज व्यक्त केली जात होती. आता या कामामुळे ती गरज पूर्ण होणार असून गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. तसेच परिसराच्या सुशोभीकरणालाही चालना मिळणार आहे.

या प्रसंगी पंचायत समिती सदस्य महेश धुरी, सरपंच सौ. प्रांजल जाधव, माजी सरपंच उदय धुरी, दयानंद धुरी तसेच उपसरपंच दीपक नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य श्रावणी धुरी, वासुदेव धुरी, गुरु सावंत, युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान, मागासवर्गीय सेल युवा तालुका प्रमुख प्रशांत जाधव, सागर धुरी, नितीन जोशी, बाळा धुरी, विनोद सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून सुरू होत असलेल्या या कामामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, शेर्ले परिसराच्या विकासाला यामुळे नवी दिशा मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा