You are currently viewing सिंधुदुर्ग पोलीस दलाचा डिजिटल पाऊलवाटेवर ठसा; सोशल मीडिया लॅब सुरू
Oplus_16908288

सिंधुदुर्ग पोलीस दलाचा डिजिटल पाऊलवाटेवर ठसा; सोशल मीडिया लॅब सुरू

सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी आधुनिक सुविधा; महाराष्ट्र दिनी परेड ग्राउंड येथे उद्घाटन समारंभ उत्साहात

सिंधुदुर्गनगरी :

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग पोलीस परेड ग्राउंड येथे सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या अत्याधुनिक सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत तांत्रिकदृष्ट्या मोठी भर पडणार असून गुन्हे तपास आणि सायबर क्राइम नियंत्रण अधिक प्रभावी होणार आहे.

या सोशल मीडिया लॅबसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली असून अत्याधुनिक उपकरणे व स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही लॅब महत्त्वाची भूमिका बजावणार असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल अधिक सक्षम व सजग होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या उद्घाटन कार्यक्रमास आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा