सावंतवाडी :
नानोस ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाचे रवींद्र भाऊराव जोशी यांनी ५८ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या विजयामुळे परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विजयानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी रवींद्र जोशी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत स्तरावर विकासकामांना गती देण्यासाठी जोशी यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी संजय जोशी, रघुनाथ जोशी, ज्ञानदेव जोशी, अनिश जोशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
