फोंडाघाटातील आण्णा चव्हाण यांचे दुःखद निधन;
फोंडाघाट :
येथील ज्येष्ठ व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आण्णा चव्हाण यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने फोंडाघाट परिसरात शोककळा पसरली आहे.
आण्णा चव्हाण यांचे फोंडाघाट बाजारपेठेत सलून व्यवसाय होता. आपल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन चांगल्या नोकऱ्यांवर स्थिर केले. मुलांनीही वडिलांच्या कष्टाचे भान ठेवत त्यांना पुढील काही वर्षे घरात विश्रांती घ्यावी, अशी विनंती केल्याने ते गेल्या ५ ते ६ वर्षांपासून बाजारात येत नव्हते.
अलिकडे आजारपणामुळे त्यांना कोल्हापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते बरे झाले होते. मात्र, मोठ्या मुलाचे लग्न समोर असताना पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूरला नेण्यात आले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनामुळे काल फोंडाघाट बाजारपेठेतील सर्व सलून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला. “एक हरहुन्नरी माणूस आपण गमावला,” अशी भावना सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.
आण्णा चव्हाण यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच सर्वांची प्रार्थना.
