You are currently viewing सावंतवाडी, दोडामार्ग व माजगाव येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षा उत्साहात संपन्न
Oplus_16908288

सावंतवाडी, दोडामार्ग व माजगाव येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षा उत्साहात संपन्न

स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लवकर तयारीचा मार्ग; विक्रांत सावंत यांच्या पुढाकारातून अभिनव उपक्रम

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये उज्वल निकालाची परंपरा कायम असली, तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे चित्र दिसून येते. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, या उद्देशाने शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य तसेच शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे युवा अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सावंतवाडी, दोडामार्ग आणि माजगाव या तीन केंद्रांवर ही परीक्षा मोठ्या उत्साहात पार पडली.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातून अधिकाधिक विद्यार्थी अधिकारी व्हावेत, हा मुख्य उद्देश असल्याचे विक्रांत सावंत यांनी सांगितले. शिक्षण हेच विकासाचे मुख्य सूत्र मानून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी विक्रांत सावंत स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचा आत्मविश्वास वाढवला. गुणवंत विद्यार्थ्यांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापक एस. एन. पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाई, पर्यवेक्षक एन. जी. मुठे तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून, शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव डी. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक तसेच शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत यांनी विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा