*जागतिक साकव्य, श्रीशब्द लालित्य तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*पुस्तकांचे महत्व*
मानवी जीवनात पुरातन काळापासून पुस्तकांचे महत्व आहे हे विसरून चालणार नाही, कागदाचा शोध लागला नव्हता तेंव्हापासूनच पुस्तकांचे महत्व आहे जुन्याकाळात लिहिण्यासाठी ताडपत्र भोजपत्रांचा वापर होत असे, पुस्तकाद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान तसेचमनातले विचार व्यक्त करता येतात पुस्तक म्हणजे ज्ञानाचे कोषागार! इतिहास भूगोल विज्ञान तत्वज्ञान ज्योतिषज्ञान अशा अनेक विषयांची माहिती पुस्तकामुळे उपलब्ध होते वाचनामुळे स्वतःला विचार करण्याची सवय लागते नवीन विचार सुचून योग्य अयोग्य काय याचाही विचार करण्याची क्षमता वाढते मनुष्याला ईश्वराने कल्पनाशक्तीचेवरदान दिलेले आहे त्यातही सुधारणा होऊन मनुष्य अधिक कल्पक होतो सामाजिक लेखन , कथाकादंबऱ्या वाचतांना आपण वेगळ्याच विश्वात रमून जातो, वेगवेगळ्या लेखकांचे लेखन वाचून भाषा तर सुधारतेच , शब्दसंग्रह सुद्धा वाढतो दर कोसावर भाषा बदलते वाचनामुळे आपण विविध भाषाशैलीचा आनंद घेऊ शकतो वि स खांडेकर न चि केळकर आचार्य अत्रे ह्याचे लेखन वाचकाला अंतर्मुख बनवते तर ना सी फडके वपु सारखे लेखक वेगळ्याच विश्वात घेऊन जातात लहानपणी मला चांदोबा नंतर बाबुराव अर्नाळकरांच्या लेखनाने अक्षरशः वेड लावले होते पण नंतर काळानुसार रुची बदलली केशवसुत कुसुमाग्रज मर्ढेकर शांता शेळकें महानोर यांच्या कवितांनी झपाटून टाकले आतातर सर्व वयोगटानुसार पुस्तके उपलब्ध असतात, पुस्तके कुठल्याही विषयाची असोत ती आपल्या मित्राची भूमिका निभावतात हे मात्र खरं! ती आपल्याला जीवनमूल्ये शिकवितात उत्तम संस्कार देतात बदल्यात कशाचीही अपेक्षा नसते त्यांची! आपले व्यक्तिमत्व घडविण्यात पुस्तकांचा सिंहाचा वाटा आहे हे कसं विसरणार! वाचनानेच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो कारण प्रत्येक अनुभव आपण स्वतः प्रत्यक्ष नाही घेऊ शकत! उदा प्रवास! प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकणार आपण, परंतु प्रवास वर्णन वाचून आनंद मिळवता येतो, इतरांच्या अनुभवातून आपण शिकू शकतो
एकटेपणात तर पुस्तकासारखा दुसरा कोणताच मित्र नाही थोर व्यक्तीची आत्मचरित्रे,वाचूनप्रेरणा मिळते समाजाप्रति आपल्या
कर्तव्याची जाणीव होते आणखी एक खास महत्वाचे म्हणजे पुस्तकात मिळालेले ज्ञान, माहिती कधी शिळी टाकाऊ होत नाही रामायण भागवत ह्या धार्मिक पुस्तकांचे आजही वाचन केले जाते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आजही लागू आहे समर्थांचा दासबोध किंवा ज्ञानोबाची ज्ञानेश्वरीचे आजही श्रद्धेने वाचन, पारायण केले जाते मोबाईल टी व्ही पेक्षा मनोरंजनाचे साधन म्हणून पुस्तक केंव्हाही श्रेष्ठच!
वेळेचा सदुपयोग होतो , आत्मविश्वास वाढतो आपला दृष्टीकोन व्यापक होतो हे निश्चित जीवनदर्शक असणारे पुस्तक हेच आपले खरे गुरू आणिखरे मित्र
सरतेशेवटी एव्हढेच म्हणेन,
वाचाल तर वाचाल
प्रतिभा पिटके
अमरावती
