सावंतवाडी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा प्राथमिक शिक्षक संघटन, सावंतवाडी यांच्यावतीने विविध ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वेशभूषा स्पर्धेत शांतिनिकेतन स्कूल, सावंतवाडीचा इयत्ता पाचवी ते सातवी या गटात कु. निहाल प्रविण राऊळ हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तर वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी या गटात कु. नैतिक रुपेश परब उत्तेजनार्थ आला. या दोन्ही विद्यार्थ्यांचे शांतिनिकेतन स्कूल, सावंतवाडी तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.