*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आयुष्याची प्रश्नपत्रिका*
आयुष्याची प्रश्नपत्रिका
कधीच सोपी नसते
अवघड असते
परीक्षा….
तयारी करता
प्रश्न अचानक उद्भवतात
आलेच नसतात
अभ्यासात...
लागतो कस
शोधतांना सगळी उत्तरे
चुकते बरे
कुठे?
आधी प्रश्न
नंतर मिळवायचं उत्तर
धडपड निरंतर
करायची….
कधी फळफळते
नशीब असते बलवत्तर
मिळते उत्तर
लगेचच….
प्रश्नपत्रिका कठीण
प्रात्यक्षिकातून जावे लागते
अनुभवातून मिळते
ज्ञान….
मनाची तयारी
कशीही असो प्रश्नपत्रिका
म्हणायचे “युरेका”
आनंदाने…!!
~~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार✍️🙏🏻🌹
