You are currently viewing आरवली-सोन्सुरे येथील तरुणाची घरात गळफास लावून आत्महत्या…

आरवली-सोन्सुरे येथील तरुणाची घरात गळफास लावून आत्महत्या…

वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद; कारण अस्पष्ट…

वेंगुर्ले

आरवली-सोन्सुरे येथील तरुणाने आपल्या राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.हा प्रकार काल रात्री घडला.उमेश सुरेश टाककर(४८), असे त्याचे नाव आहे.याबाबत वेंगुर्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वरची सोनसुरेवाडी येथे उमेश टाककर एकटेच आपल्या राहत्या घरात राहत असत. सायंकाळी उशीर झाला तरीही घरात असूनही आतील लाईट सुरू न केल्याने बाजूला रहाणारे आत्माराम टाककर यांनी त्यांना आवाज दिला. मात्र घरातून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आत्माराम यांनी खिडकीतून घरात डोकावले असता उमेश हे दोरीला लटकत असल्याचे दिसून आले. तात्काळ त्यांनी बाजूच्या ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. तसेच पोलिसांनाही कळविले. त्यानुसार शिरोडा पोलीस दूर क्षेत्राच्या पोलीस रंजीता चव्हाण यांनी अन्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेऊन उमेश टाककर यांचा मृतदेह पंचनामा करून खाली उतरला. त्यानंतर शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी अधिक तपास चव्हाण करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा