You are currently viewing सायनच्या रुग्णालयात महापुरुषांची संयुक्त जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

सायनच्या रुग्णालयात महापुरुषांची संयुक्त जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

मुंबई (प्रतिनिधी)

लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिवर्षीप्रमाणे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले,व भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करते. अलिकडे सायन येथे आयोजित कार्यक्रमात डॉ आंबेडकर मेडिकल कॉलेज (डामा) येथील विद्यार्थीनी प्रथमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली महापुरुषांवर परिसंवाद सादर केला ते पाहता माणूसपण आणि भावविश्व तसेच इतिहासातील त्या घटनांमधून भावना, संघर्ष,दुष्टीकोन मांडण्याचा प्रयत्न केला गेला असे लो.टि.म.स. रुग्णालय, अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी बौद्धजन सेवा संघ (रजि)व डॉ बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जयंती महोत्सव प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे पुढे म्हणाले की, आजच्या दिवशी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रुग्णांची सेवा करीत असताना सामाजिक भान लक्षात घेऊन वंचितांना शिक्षणापासून दूर कसं राहावे लागले ते मांडलं तसेच त्यांना कशा खस्ता खाल्ल्या यांचे दर्शन घडवून व्यक्तिरेखा जिवंत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हे यातून दिसून आलं. या सहभागी विद्यार्थीना त्यांच्या सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नाट्य दिग्दर्शक झी मराठी गौरव पुरस्कार विजेते राहूल भंडारे, विद्यार्थी परिषद, प्रमुख लो.टि. वैद्यकीय महाविद्यालय डॉ. सुधीर पवार, राष्ट्रीय सरचिटणीस दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया भिकाजी कांबळे गुरुजी, सल्लागार बौद्धजन सेवा संघ प्रवीण साळवी, अध्यक्ष संतोष खरे, सचिव दिनेश कदम, कोषाध्यक्ष तथा कामगार सेना सचिव सुनील पाटील, डॉ आंबेडकर मेडिकोज सचिव वेदांत चव्हाण, कोषाध्यक्ष निशांत कोंडे, समाजसेविका भारतीबेन शिंगोळी, शिवसेना विभागप्रमुख गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे हे उपयुक्त पुस्तक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विश्ववदनीय राजे शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला हे झी गौरव पुरस्कार विजेते नाटक सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या रंगतदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष सुनील पाटील यांनी अतिशय सुबक शब्दात केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा